कथा क्र.239
एक अत्याचारी राजा राज्य करत होता. जेव्हा प्रजा त्याच्या अत्याचाराने त्रस्त झाली होती. तेव्हा देवराज इंद्राने त्याला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी शिका-याचे रूप धारण करून नगरात प्रवेश केला. शिका-यासोबत एक भयंकर कुत्रा होता. शिकारी आणि कुत्रा राजमहालाजवळ पोहोचले. तेथे पोहचताच आधीच ठरल्याप्रमाणे जोरजोरात भुंकण्यास सुरुवात केली. राजा दचकून जागा झाला. त्याने शिका-याला कुत्र्याच्या भुंकण्याचे कारण विचारले. शिकारी म्हणाला, राजन माझा कुत्रा उपाशी आहे. त्याची भूक शमवली पाहिजे. राजाने नोकरांना आज्ञा दिली. खाद्यभंडारामध्ये जे काही सर्व त्या कुत्र्यास खाण्यास दिले. तरीही तो कुत्रा भुंकण्याचे काही थांबेना. राजा हतबल झाला. तेव्हा शिकारी म्हणाला, जोपर्यंत तुझ्या राज्यातील लोकांवरील अत्याचार थांबणार नाहीत, लोक सुखी असणार नाहीत तोपर्यंत हा कुत्रा भुंकण्याचे थांबवणार नाही. हा कुत्रा अन्यायाचे प्रतीक आहे. अन्यायाला वाचा फोडण्याचे काम हा करत आहे. अत्याचार, अनाचार, सावळागोंधळ करणे हे थांबविणे हे राजाच्या हातात असते. हे ऐकून राजाच्या डोक्यात प्रकाश पडला व त्याने शिका-याचे पाय धरून क्षमा मागितली व भविष्यात नीट वागण्याची हमी दिली.
मराठी बोधकथा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा