गुरुवार, ९ जानेवारी, २०२५

विचारपण

 🌹🌹🌹🌹 विचारपण 🌹🌹🌹🌹


उतू नको मातू नको

लोकांच्या ताटात बघायचं 

अजिबात सोडू नकोस 

बावरले्ल्या जीवाला कधीच 

घाबरवायचं स़ोडू नकोस 


अडकलेला कुणी असेल तर 

मजा घ्यायची सोडू नकोस 

त्रास देताना कमी 

कधीच तू पडू नकोस 


संकटकाळी मदतीचा

हात पुढे तू करू नकोस 

दुसऱ्याचं कौतुक कधी 

चुकुनही करू नकोस 


चांगलं फक्त आपलंच 

हेका कधी सोडू नकोस 

तुझं ते सगळं माझं 

हे ब्रह्मवाक्य विसरू नकोस 


दुसऱ्याला मोठेपणा 

मुळीच कधी देवू नको

आलेल्या संधीला मात्र 

मुळीच डावलू नकोस 


आपण कोण याचा

विचार कधी करू नकोस 

पाप पुण्याचा हिशोब 

मनामध्ये चुकुनही आणू नको


मागे कोण काय बोलतो 

याची भीती सोडून दे

आपल्या झोळीत सगळं

राहावं म्हणूनच 

सगळं कमवून घे


चांगलं वाईट सगळं 

खरं हेच तू मानून घे

माणुसकी अन् भूतदया 

या शब्दांना अंतर दे


झालं गेलं विसरून जावं

ह्याच्याशी फारकत घे

मनात एक अन् चेहरा एक

मुखवटे तू सजवून घे


माणूस म्हणून जगताना 

माणूसपण विकत घे

प्राण्यांपासून इमानदारी

शिकता आली तर शिकून घे


चार दिवस आयुष्याचे

सुखाने तू जगून घे

आनंदाचे चार क्षण 

वाटता आले तर वाटून घे.

आपल्या पुरते न जगता

दुसऱ्यासाठी जगून घे 


लेखन 

संदीप सुधीर जोशी, पंढरपूर 

दि. ८ जानेवारी २०२५

मंगळवार, १ सप्टेंबर, २०२०

 🙏नमस्कार 🙏

मी संदीप जोशी आपणा सर्वांचे मराठी बोधकथा मध्ये सहर्ष स्वागत करीत आहे.

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

भारतीय संस्कृती ही सर्व जगात आदरणीय आहे ती अजूनच चांगली घडावी, आजकालची सर्वत्र वाचन संस्कृती कमी होत चालली आहे लोक वाचन करायचा कंटाळा करतात त्यांना वाचन करायला वेळ मिळत नाही अशा लोकांना छोट्या स्वरूपात काहीतरी वाचण्यासाठी देणे जे एक ते पाच मिनिटात वाचून पूर्ण व्हावे व त्यातून काहीतरी बोध मिळावा या हेतूने मी मराठी बोधकथा हे फेसबुक पेज व याच नावाचा ब्लॉग चालवत होतो पण सध्याच्या काळात नवीन पिढी म्हणजेच आपली लहान मुले ही बहुतांश वेळा युट्युब वर काही ना काही पाहत बसलेले असतात त्यांना चांगले विचार, चांगल्या कथा जर ऐकायला मिळाल्या तर!!!!🤔🤔🤔🤔🤔

 हा एक विचार डोक्यात आला आणि

😇😇😇😇😇आपल्याच बोधकथा या व्हिडिओ स्वरूपात आपण सादर करू शकलो तर किती बरे होईल या हेतूने आज मराठी बोधकथा नावाचे यूट्यूब चॅनल मी सुरुवात करत आहे. आपल्याकडून मला प्रतिसादाची अपेक्षा आहे या चॅनेल मध्ये जवळपास 400 च्यावर व्हिडिओ पोस्ट होतील असा एक अंदाज मला वाटतो. कारण मराठी बोधकथा या पेज वरती मी आत्तापर्यंत 400 कथा पोस्ट केलेल्या आहेत. अजूनही काही कथा टाईप करायच्या शिल्लक आहेत म्हणजे 400 पेक्षा जास्त बोधकथा आपणास व्हिडीओ स्वरूपात पाहावयास मिळतील व त्यातून आपल्या पुढच्या पिढीला चांगली विचारसरणी व उच्च विचार, चांगले मार्गदर्शन मिळेल अशी अपेक्षा आहे. आपण आज पर्यंत माझ्यावरती जो विश्वास दाखवला आहात तोच या नवीन चॅनल वरती दाखवा व माझे नवीन चॅनल सबस्क्राईब करा.🔔🔔🔔🔔🔔🔔व्हिडिओ लाईक करा.

👍👍👍👍👍👍 शेअर करा व जास्तीत जास्त मित्र मैत्रिणी व आपल्या परिवारास या चॅनल बद्दल माहिती कळवा धन्यवाद🙏


संदीप जोशी 

मराठी बोधकथा 

पंढरपूर


खाली दिलेल्या निळ्या लिंकवर क्लिक करून आपण मराठी बोध कथेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.

https://youtu.be/MFIvHAymvX4

शुक्रवार, २७ मार्च, २०२०

परीक्षेला जाणा-या प्रत्येकासाठी


बदलत गेला तो काळ


आठवणींचा गाव


माझ्या मना बन दगड


एकांत तीरावरला


तुझाच विचार


होळी रे होळी


बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा


तुझ्या रंगात रंगले मी


काळजी घे


अपेक्षा


व्यर्थ


अनंताची अनुभूती


इच्छा ठेव


जे वाटेल ते


अस्तित्त्व


आयुष्याचे रंग