कथा क्र.197
एकदा स्वप्न आणि सत्य यांचे जोरदार
भांडण झाले. भांडणाचा विषय होता ’भविष्य घडविण्यात सर्वाधिक सहभाग कोणाचा
असतो’ दोघेही खूप भांडले, भरपूर वाद घातला पण निर्णय काही होईना. शेवटी दोघेही आपल्या
पित्याकडे गेले. पित्याला वादाचा विषय सांगितला. पिता म्हणाला,’’ज्या कोणाचे हात
आभाळाला टेकतील पण तरीही पाय जमिनीवर असतील त्याचा भविष्य घडविण्यात निर्णायक
सहभाग असतो.’’ दोघेही परत आले. सर्वप्रथम स्वप्नाने एकाच उडीत त्याचे हात आभाळाला टेकले,
मात्र पाय जमिनीपासून केव्हाच उचलले गेले होते. मग सत्याने प्रयत्न केला मात्र
त्याचे पाय कायम जमिनीवर टेकलेले होते पण हात आभाळाला पोहोचू शकले नाहीत.
दोघांनीही खूप प्रयत्न केले पण दोघेही अयशस्वी राहिले. शेवटी थकून ते पुन्हा
एकदा पित्याकडे गेले तेव्हा पिता म्हणाला,’’ भविष्य घडविण्यात
सत्य आणि स्वप्न या दोघांचाही समान सहभाग असतो.’’
तात्पर्य :- ख-या अर्थाने भविष्य
घडवायचे असेल तर स्वप्नाला सत्याच्या खांद्यावर उभे राहायला हवे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा