फेसबुक.कॉम/मराठी बोधकथा
कथा क्र.248
कोणे एके काळी एका नगरात एक वृद्ध एकटाच राहत होता. छोट्याशा झोपडीत राहून तो आजूबाजूच्या शेतात छोटीमोठी कामे करून स्वत:ची गुजराण करत असे. आपल्या गरजा त्याने खूपच मर्यादित ठेवल्या असल्याने त्याला फारसा खर्च येत नसे. मात्र हे असताना त्याने एक कासव पाळले होते आणि त्या कासवावर त्याचा फार जीव होता. दुपारी आपले जेवण तयार करताना तो कासवासाठी हरभरे भिजवून त्याला देत असे. रिकामा वेळ असताना तो त्या कासवाशी संवाद साधत असे. आजूबाजूचे लोक त्याचे ते कासवप्रेम पाहून हसत असत. एके दिवशी एक परिचित मनुष्य त्याला भेटण्यासाठी आला. थोडा वेळ इकडचे तिकडचे बोलून झाल्यावर त्याने त्या कासवाला पाहिले व तो मनुष्य म्हणाला,'' तू इतका घाणेरडा प्राणी कशासाठी पाळला आहेस. सोडून दे त्या कासवाला.'' त्याच्या बोलण्याने वृद्धाला खूप वाईट वाटले. वृद्ध म्हणाला,''अरे मित्रा, तू असे बोलून माझ्या काळजाला हात घातला आहेस. इतके वाईट तर मी कधीच त्या कासवाबद्दल माझ्या मनात किंवा स्वप्नातसुद्धा विचारत आणत नाही. ते कासव माझ्या गुरुस्थानी आहे म्हणून माझ्या मनात त्याच्याबद्दल खूप आदर आहे.'' तो माणूस म्हणाला,''ते कासव तुझे गुरु कसे काय बरे ठरते'' वृद्ध म्हणाला,'' कासव हे मानवी मनाचे प्रतिक आहे. कासव आपल्याला हे शिकवते की त्याच्यावर जरा जरी संकटाची चाहूल लागली तरी ते जसे स्वत:चे अंग आक्रसून कवचाखाली जाते त्याप्रमाणेच मानवाने वाईट गोष्टींची जराशी चाहूल जरी लागली तरी त्यापासून लांब राहिले पाहिजे. कासवाप्रमाणे आपण आपल्या मनाला वाईट गोष्टींपासून अंग चोरण्याचा प्रयत्न केला तर मानवाचे त्यात भले आहे.''
वर्तमानपत्रातून संग्रहित
मराठी बोधकथा

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा