कथा क्र.208
भोजराजा महादानी आणि धार्मिक प्रवृत्तीचा होता. त्याच्या उदारपणाच्या अनेक
कथा त्याच्या राज्यापासून अन्य राजातही प्रसिद्ध होत्या. याच कारणांमुळे तो
बहुसंख्य लोकांचे श्रद्धास्थान बनलेला होता. राजा भोज यांना एकदा अस्वस्थ वाटू
लागले. तेव्हा वैद्यांनी हात टेकले. राजा भोजने तत्क्षणी आपल्या दिवाणास
निमंत्रित करून त्याला सांगितले, मी आता फार वेळ जगणार नाही. जेव्हा माझी अंत्ययात्रा
स्मशानस्थळी घेऊन जाल तेव्हा माझा एक हात पांढरा व दुसरा हात काळा करा. ते दोन्ही
हात सर्व लोकांना असे दाखवतच घेऊन जा. भोज राजाची ही इच्छा दिवाणास मोठी विचित्र
वाटली. त्याने विचारले, महाराज असे करण्यासाठी तुम्ही का सांगता आहात. राजा म्हणाला,’’माझे रिकामे हात पाहून सगळ्यांना माहित होईल की राजा असो वा भिकारी सर्वजणच
रिकाम्या हातानेच जातात. पांढरा आणि काळा रंगांचे वैशिष्ट्य म्हणजे की व्यक्तिसोबत
जे जाते ते त्याचे चांगले किंवा वाईट कर्म. मला यातून सर्वाना हेच सुचवायचे आहे
की जन्मापासून मृत्यूपर्यंत सत्कर्म आणि चांगले आचरण ठेवावे.’’
तात्पर्य :- जन्मापासून मृत्यूपर्यंत सत्कर्म आणि चांगले आचरण ठेवावे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा