मंगळवार, २२ ऑक्टोबर, २०१३

मातेचा उपदेश

कथा क्र.135
एका बाईला एक मुलगा व एक मुलगी होती. देवाने मुलाला रूप, तर मुलीला गुण दिले होते. आईचे दोन्ही मुलांवर खूप प्रेम होते. एकदा भाऊ आरशासमोर उभा राहून गर्वाने आपल्या बहिणीला म्हणाला, "ताई गं मी बघ किती सुंदर, नाही तर तू!' भावाचे हे बोलणे बहिणीच्या मनाला लागले. ती आपल्या आईकडे गेली व भावाची तक्रार केली. यावर आईने दोघांनाही जवळ बोलावले, प्रेमाने समजूत काढली. आई पहिल्यांदा मुलाला म्हणाली, अरे बाळा, नुसते रूप काय कामाचे? नुसत्या रूपाला या जगात किंमत नाही. तेव्हा तू जसा दिसायला सुंदर आहेस, तसा गुणानेही सुंदर हो' त्यानंतर आई आपल्या मुलीला म्हणाली, हे बघ बाळे, तू गुणी तर आहेसच. देवाने तुला रूप दिले नाही म्हणून वाईट वाटू नकोस. छान नीटनेटकी रहा, सर्वांशी इतकी चांगली वाग की तुझ्या रूपाकडे कुणाचेच लक्ष जाणार नाही.

तात्पर्य : जगात पुढे जाण्यासाठी नुसते चांगले रूप असून चालत नाही, तर त्याला सद्‌गुणांची जोड द्यावी लागते. 


==============
वर्तमानपत्रातून संग्रहित 
==============

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा