बुधवार, २३ ऑक्टोबर, २०१३

संतुलन

कथा क्र.139

गौतम बुद्धाकडून राजकुमार श्रोणने दीक्षा घेतली होती. एकेदिवशी बुद्धांच्‍या अन्‍य शिष्‍यांनी श्रोणची तक्रार करत म्‍हणाले की ''श्रोण तपाच्‍या उच्च सीमेपर्यंत पोहोचला आहे पण चिंता वाटते की सारे भिक्षू दिवसातून एकदाच भोजन करतात पण श्रोण मात्र दोन दिवसातून एकदा भोजन करतो आहे. अन्नपाणी ग्रहण न केल्‍यामुळे तो फारच अशक्त झाला आहे. हाडांचा सापळा दिसायला लागला आहे.'' हे ऐकून बुद्धांनी श्रोणला बोलावले आणि म्‍हणाले,'' श्रोण, तू पूर्वी सितार चांगले वाजवित होता हे खरे काय? आता वाजवून दाखवू का?'' श्रोण म्‍हणाला,''होय मी आपल्‍याला सितार वाजवून दाखवू शकतो. परंतु आपण आता सितार का ऐकू इच्छित आहेत हे मला समजले नाही?'' बुद्ध म्‍हणाले,'' मी असे ऐकलंय की, सितारच्‍या जर तारा ढिल्‍या झाल्‍या असतील तर ते नीट वाजत नाही.किंवा जास्‍त घट्ट झाल्‍या तरी त्‍यातून चांगले संगीत निर्माण होत नाही.'' श्रोण म्‍हणाला,'' होय ते खरे आहे तारा ढिल्‍या झाल्‍या तर सूर बिघडणार आणि तारा घट्ट झाल्‍या तर तारा तुटणार तेव्‍हा तारा मध्‍यम असाव्‍यात'' बुद्ध म्‍हणाले,'' सितारप्रमाणेच मानवाचे जीवन आहे, तप करावे पण अन्नही योग्य प्रमाणात भक्षण करावे. भोग अति घेणे वाईट आहे.''

तात्‍पर्य-'अति सर्वत्रं वर्जयेत' जीवनात नियम आणि तप आवश्‍यक आहे पण एका विशिष्‍ट संतुलनाने. कारण अति तेथे माती हा नियम सगळीकडेच लागू होतो.
__________________
वर्तमानपत्रातून संग्रहित 
______________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा