मंगळवार, २२ ऑक्टोबर, २०१३

(ज्ञानाचा दिवा तेवत ठेवा.)


कथा क्र.136

प्रसंग महाभारतातला आहे. द्रोण जेंव्हा गुरुकुलामध्ये वर्गात कौरव आणि पांडवांना शिकविण्यासाठी तेंव्हा ते अत्यंत प्रसन्न होते. द्रोण स्वतः परम गुरु होते. मात्र त्या एका दिव्य ज्ञानाचा अनुभव आला होता आणि तोच त्यांच्या सर्व अस्तित्वातून अभिव्यक्त होत होता. वर्गात गुरुदेव आल्याबरोबर त्यांनी तोच अनुभव विद्यार्थ्यांना सांगितला. त्यांनी सांगितले कि काळ रात्री एक अशी घटना घडली कि, अर्जुन आश्रमात भोजन करीत होता. बाकी विद्यार्थ्यांचे भोजन आटोपले होते. रात्र बरीच झाली होती. अर्जुन एका दिव्याच्या भोजन करत होता. अचानक हवेची झुळूक आली आणि दिवा विझला. मात्र त्यानंतरहि अर्जुन भोजन करत राहिला अंधारातही त्याला भोजन करण्यास बाधा वाटली नाही. भोजन पूर्ण झाले आणि अर्जुन उठला आणि धनुर्भ्यास करू लागला. गुरुनी पुढे सांगितले, बाणांचा आवाज ऐकून मी बाहेर आलो तेंव्हा अर्जुनाने मला सांगितले कि भोजनादरम्यान मला अंधाराचे काही वाटले नाही तसेच बाण चालवितानाही मला अंधाराचा अडसर आला नाही. बघा गुरुवर्य ! आपल्या कृपेमुळे मला अंधारातही बाण लक्ष्यापर्यंत पोहोचविता येत आहेत. गुरुजी म्हणाले,"अर्जुनाचा हा प्रयत्न अनुकरणीय आहे. दिवा फक्त उजेडाचा प्रसार करतो पण अंधारात मात्र ज्ञानाच्या दिव्याने, हृदयातील आत्मज्योतीने जर सराव केला तर कोणतेच काम अशक्य नाही."

तात्पर्य- सरावानेच माणूस लक्ष्य प्राप्त करू शकतो. एक विशिष्ट उंची गाठण्यासाठी, यश प्राप्तीसाठी अंतरीच्या ज्ञान ज्योतीला जागृत करणे गरजेचे आहे.

==============
वर्तमानपत्रातून संग्रहित 
==============


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा