बुधवार, ११ डिसेंबर, २०१३

(निर्णय)


कथा क्र.153

एक राजा होता. तो वेगवेगळे वेश परिधान करून राज्यात फेरफटका मारत असे. त्या निमित्ताने त्याचा जनतेशी होत असे. जनतेचे दुःख, वेदना, गरजा यांची तो माहिती करून घेत असे. एके दिवशी अचानक त्याच्या मनात विचार आला कि आपण सर्व देशात फिरून जनतेचे दुःख, गरजा यांची माहिती करून घ्यावी व त्यावर उपाय करावे. त्याच्या प्रवासाला त्याने सुरुवात केली आणि पूर्ण देशात फिरून तो परत आला. परत आल्यावर तो महालातून बाहेरच पडेन. शेवटी सगळे मंत्रीगण त्याच्या भेटीला महालात गेले तेंव्हा राजाने त्यांना त्याची कहाणी ऐकवली व मंत्र्यांकडे त्याने त्याचे पाय खूप दुखत असल्याची तक्रार केली. राजाचे असे म्हणणे होते कि रस्त्यात जे दगड धोंडे, गोटे पडले आहेत त्यामुले त्याचे पाय खूप दुखत आहेत. यावर काही उपाय लवकरात लवकर केला पाहिजे. मंत्रीगण विचार करू लागले कि काय उपाय करावा? पण राजाच तत्काळ म्हणाला कि या देशात कुणाला सुद्धा दगडगोटे टोचू नयेत यासाठी सर्व रस्त्यांवर एक चामडे अंथरले जावे व त्याने संपूर्ण रस्ता आच्छादित करावा. राजाचे हे बोलणे ऐकून सगळे मंत्रीगण आता मात्र कोड्यात पडले कि या मूर्खपणाच्या निर्णयावर बोलावे तरी कसे आणि काय? कारण जो उलट बोलेल त्याला राजा शिक्षा करेल. म्हणून कोणीच काही बोलले नाही. शेवटी मध्ये बराच वेळ गेला कोणीच काही बोलेन तेंव्हा एक बुद्धिमान मंत्री उठला व राजाला म्हणाला कि महाराज मी एक उपाय सुचवितो ज्याने चामडे अंथरण्यासाठी लागणारा अतिरिक्त पैसा वाचेल आणि तुम्हालाही दगडगोटे टोचणार नाहीत. राजा म्हणाला सांग कि लवकर! मंत्री म्हणाला,"सगळ्या देशातील रस्त्यांवर चामडे अंथरण्यापेक्षा महाराज तुम्हीच चांगल्या प्रतीचे जोडे का बनवून घेत नाहीत? यातून खर्च हि कमी होईल आणि तुम्हाला पण कष्ट होणार नाहीत." राजा आश्चर्य चकित होवून मंत्र्याकडे पाहत राहिला आणि दुसऱ्याच क्षणी त्याने जोडे बनविण्यासाठी कारागिराला बोलावणे धाडले. 

तात्पर्य- कायम अशा उत्तराबद्दल विचार केला पाहिजे कि ज्यामुळे आपले कमीत कमी नुकसान होइल. भावनेच्या भरात घेतलेले निर्णय कधीकधी चुकूही शकतात. दुसऱ्यांबरोबर चर्चा करूनही कधी कधी उत्तर मिळते. . 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा