कथा क्र.257
एका स्त्रीचा पती तरूणपणीच वारला. तिला एकच मुलगा होता. तिने मजुरी करून मुलाला शिकविले. ज्यादिवशी मुलाला नोकरी लागल्याचे तिला समजले तेव्हा समजले तेव्हा तिच्या आनंदाला पारावार उरला नाही. तिच्या परिश्रमांचे चीज झाले असे तिला वाटले. पण पुढे जाऊन मुलगा तिला विचारेनासा झाला. एकदा तर आई आणि मुलामध्ये प्रचंड वादावादी झाली. मुलाने टोकाचा निर्णय घेतला व आईच्या डोक्यात दगड घातला. बिचारी आई रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर पडली. रस्त्यावरून जाणा-या एका वाटसरूने दुस-या एकाला विचारले,''का हो बुवा, या म्हातारीला असे काय झाले की रस्त्यावर रक्तबंबाळ अवस्थेत पडली आहे.'' दुसरा माणूस त्या वाटसरूला म्हणाला,'' अहो महाराज या बाईच्या पोटच्या मुलाने भांडण केले व भांडणाभांडणात त्याने हिच्या डोक्यात दगड घातला व मुलगा निघून गेला.'' वाटसरू हळहळला व म्हणाला,'' काय पण बिचारीवर दिवस आले, पोटच्या मुलगा इतका कसा वाईट निघू शकतो, दुष्ट, दुराचारी, नराधम मुलाला तर खरे म्हणजे फासावरच द्यायला पाहिजे आहे.'' त्याचे हे बोलणे ऐकताच इतकेवेळ आडवे पडून असणारी आई जागेवरच उठून बसली व म्हणाली,'' बाबा रे तू तुझ्या रस्त्याने निघून जा. माझा मुलगा हा माझ्यासाठी अनमोल ठेवा आहे. आत्ता तो रागात आहे. राग शांत झाल्यावर त्याला त्याची चूक समजून येईल व तो पुन्हा आईच्या मायेसाठी माझ्या मांडीवर विसावण्यासाठी परत येईल. बाबा रे, मला जर मुलगाच झाला नसता तर मला कोणी आई म्हणून हाक मारली असती. त्याच्यामुळे मी आई झाले आहे. तो चुकीचा वागला असेल तर माफ मीच करणार आहे.''
तात्पर्य – मुलाने कितीही चूक केली तरी माफ करणारी ती एकमेव अशी ....................................आई
वर्तमानपत्रातून संग्रहित
मराठी बोधकथा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा