फेसबुक.कॉम/मराठी बोधकथा
कथा क्र.२४६
एक पंडीत दररोज प्रार्थना करायचे, भगवंता, मला सत्याचा मार्ग दाखविणारा मार्गदर्शक भेटू दे, त्यांची प्रार्थना ऐकून एका संताने त्यांना जवळच असलेल्या मंदिरात जाण्यास सांगितले, तेथे तुम्हाला खरा मार्गदर्शक मिळेल. पंडीतजी तात्काळ तिकडे पोहोचले. तेथे फाटक्या अवस्थेत एक माणूस बसलेला होता. पंडीतजी त्याला पाहून म्हणाले, देवाने तुला चांगले दिवस दाखवले आहेत. तो म्हणाला, मला तर वाईट दिवस कधी आलेच नाहीत. पंडीतजी म्हणाले, देवाने तुझ्या नशिबावर पडलेली धूळ हटवली पाहिजे. तो म्हणाला, माझ्या नशिबावर धूळ साचलेलीच नाहीये. पंडीतजींनी विचारले, मी तुला हरप्रकारे सुखी राहावे म्हणून चांगले बोलतो आहे, तर त्यावर तू मला उलट उत्तरे देतो आहेस. तो पुन्हा म्हणाला, चांगले-वाईट मला माहित नाही. पण इतकेच जाणतो की, वाईट घटना माझ्या आयुष्यात घडलीच नाही. पंडीतजी म्हणाले, तुझा अवतारच सांगतोय की तू किती दु:खीकष्टी आहेस, त्याने खुलासा केला, तुम्ही म्हणालात, मला देवाने चांगले दिवस दाखवले, परंतु मी नेहमी ईश्वराचे स्मरण करण्यातच तल्लीन राहतो. यामुळे दु:खाची अनुभूती झालेली नाही मग म्हणालात, माझ्या नशीबावर धूळ साचली आहे पण चांगली-वाईट परिस्थिती असणे हे देवाचे देणे आहे. परिस्थिती चांगली असो की वाईट असो त्यातच खरे सुख आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा