मराठीत ऐकलेल्या, वाचलेल्या काही निवडक बोधकथांचा एक संग्रह.
शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०१३
(कथा आईनस्टाईनची)
कथा क्र.130
अल्बर्ट आईनस्टाईन लहानपणी शिक्षणाच्या बाबतीत फारच विरक्त होते. त्यांना शाळेत जाणे आणि शिकणे अजिबात आवडत नव्हते. जेव्हा शाळेचे शिक्षक अल्बर्ट यांना एखाद्या विषयाबाबत आठवायला सांगत तेव्हा त्यांना तो विषय आवडत नसे. त्यांना तर चिंतन-मनन करणे आवडायचे. एका विषयावर विचार करत असताना ते तासनतास घालवत असत. त्यावेळी त्यांना शिक्षकांच्या शिक्षेस सामोरे जावे लागत असे. एकेदिवशी अल्बर्टने आपल्या आईवडीलांना सांगितले की, मी आता शाळेत जाणार नाही. आईने कारण विचारले, तेव्हा छोटा अल्बर्ट म्हणाला,''आई तेथे शिक्षण नाही तर पोलिस शिकवतात, छोट्या छोट्या कारणावरून रागवतात, मला ते सहन होत नाही आणि गणित विषय हा तर मला खायला उठतो.'' तेथेच अल्बर्टचे काका जेकब बसलेले होते ते त्याची गोष्ट ऐकून म्हणाले,'' बेटा, हे काय सांगत आहेस की तुझे मन गणितात लागत नाही, मग तुझे खेळातही मन लागत नाही का.'' अल्बर्ट म्हणाला'' खेळात तर माझे मन लागते'' जेकब म्हणाले,'' तर ये मग, आपण चोर-पोलीस खेळूया'' जेकबने काही रेषा काढल्या आणि गोटया सरकावू लागले. अल्बर्ट यांची खेळातली आवड आणि कौशल्य पाहून जेकब म्हणाले,'' हेच तर बीजगणित आहे त्यात संख्यांचा शोध घ्यावा लागतो.'' अल्बर्ट म्हणाला,'' काका, हेच गणित आहे, यात अवघड असे काहीच नाही, असे गणित जर असेल तर मी शाळेत जायला तयार आहे''
तात्पर्य-विषय सोपा करून सांगणे ही शिक्षकाची आवड असली पाहिजे. शिक्षकांनी सोपे करून सांगितल्यास विद्यार्थ्याना लगेच समजते. पालकांनीही मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष दिल्यास मुले नवीन कल्पना स्वीकारू लागतात व त्यातून चांगला परिणाम मिळतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा