मंगळवार, १९ नोव्हेंबर, २०१३

बैल आणि चिलट


कथा क्र.146

एक बैल एका झाडाखाली स्वस्थपणे रवंथ करीत बसला होता.इतक्यात एक चिलट येऊन त्याच्या शिंगावर बसले. चिलट जरा आगाऊ होते. चिलट बैलाला म्हणाले, मी तुझ्या शिंगावर बसलोय. पण तुला जड वाटत नाही ना! तुला माझं वजन पेलवत नसलं तर तसं सांगमी आपलं दुसरीकडे जाऊन बसेन. त्यावर बैल डोळे मिटूनच म्हणाला, मूर्खा, तुला हवं तर बैस किंवा उडून जा. तुझं हे आगाऊपणाने बोलणं ऐकलं तेव्हा कुठे मला समजलं, तू माझ्या शिंगावर आहेस ते! 

तात्पर्य : काहीजणांना आपण फार मोठे आहोत असं वाटतं. पण त्यांना लोक काडीची किंमत देत नाहीत।

______________वर्तमानपत्रातून संग्रहित _______________



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा