मंगळवार, १७ डिसेंबर, २०१३

सिंहाची गुणज्ञता

कथा क्र.154

एका सिंहाने एक हरिण मारले व त्यांस तो फाडून खाणार, इतक्यात त्या वाटेने एक चोर जात होता, तो त्यास म्हणतो, "अरे सिंहा, "या हरिणाचे अर्धे मांस तुझे व अर्धे माझे' हे ऐकून सिंह म्हणाला, "अरे निगरगट्ट माणसा, "तुझा येथे कोणत्याही प्रकारचा संबंध नसता, एकाकी पुढे होऊन, मी मारलेल्या सावजाचे अर्धे मांस तू मागतोस, या तुझ्या निर्लजपणाबद्दल मी तुला शिक्षा करण्यापूर्वी तू येथून चालता हो, नाही तर फुकट मरशील मात्र.' हे ऐकताच चोर भयाने पळून गेला. इतक्यात दुसरा एक भला माणूस त्या वाटेने आला व सिंहास पाहून, त्यास टाळण्यासाठी दुसऱ्या वाटेने जाऊ लागला. ते पाहून सिंह त्यास आदराने हाक मारुन म्हणाला, "अरे भल्या माणसा, भिऊ नकोस, तुझ्या चांगुलपणामुळे, या सावजाच्या मासांचा अर्धा भाग घेण्यास तू अगदी योग्य आहेस, इकडे ये आणि आपला वाटा घेऊन जा.' इतके बोलून सिंहाने त्या सावजाचे दोन भाग करुन एक भाग आपण खाल्ला व दुसरा त्या माणसाकरिता ठेवून तो अरण्यात गेला.


तात्पर्य : लोचटपणा करुन डोके उठविणाऱ्या माणसाचा लोकास कंटाळा येतो. पण जे सभ्य आणि भिडस्त आहेत, त्यांचा परामर्श लोक आपण होऊन घेतात.
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा