कथा क्र. 211
काका कालेलकर उच्च कोटीचे चिंतक, लेखक होते. त्यांची
विचारक्षमता प्रत्येक विषयात खोल आणि व्यापक होती. एकदा काका आजारी पडले. त्यांच्या
आजारपणाची वार्ता प्रसिद्ध होताच अनेक मित्रमंडळी आणि शुभचिंतक त्यांना भेटायला
आले. काका सर्वांशी मोठ्या आत्मीयतेने भेट देत असत. एके दिवशी काकांना भेटायला त्यांचे
काही मित्र आले होते. चर्चेदरम्यान दुस-या एका मित्राचा फोन काकांना आला. त्याने
काकांना विचारले,’’आपण आजारी असल्याचे मी ऐकले आहे, आता कसे
वाटते आहे’’ काका म्हणाले,’’ होय, थोडा आजारी पडलो होते मात्र जेव्हापासून
मी नव्याने तपासणी केली आहे तेव्हापासून मला बरे वाटायला लागले आहे’’ हे ऐकताच मित्राने नव्या तपासणीविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा
काका म्हणाले,’’ मी आजाराबाबत विचार करणेच सोडून दिले आहे
आणि हा पर्याय माझ्या आजारावर उपाय म्हणून सिद्ध झाला आहे. एखादा पाहुणा चांगला
पाहुणचार केल्यामुळे जास्त दिवस मुक्काम करतो तेच त्याच्याशी उलटपक्षी वागले
असता म्हणजेच घरातल्यांशी जसे वागतो, तशी साधी वागणूक मिळाली, विशेष पाहुणचार न
मिळाल्यास तो अशा घराचा रस्ता धरतो जिथे चांगले आदरातिथ्य केले जाईल.
आजाराबाबतीतही माझा हाच विचार आहे.’’ काकांच्या नव्या उपचार
पद्धतीवर मित्रांसह सर्वच लोक सहमत झाले.
तात्पर्य :- आजारापेक्षा जास्त त्याची चिंता तणाव वाढवते. त्यामुळे कोणत्याही
शारीरिक अस्वस्थतेला सकारात्मक विचाराने घेण्याचा प्रयत्न करा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा