कथा क्र.232
एका वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये वेड्यांना बाहेर पडेपर्यंत म्हणजेच पूर्ण बरा झाला आहे की नाही हे पाहण्यासाठी अनेक मानसशास्त्रीय चाचण्यांना तोंड द्यावे लागत असे. त्यातील शेवटच्या चाचणीमध्ये वेड्यासमोर एक नवे कोरे चकचकीत पाच रूपयांचे नाणे आणि एक मळकट पन्नास रूपयांची नोट ठेवली जाई. त्यातील फक्त एकच गोष्ट त्याला उचलण्यास सांगितली जाई. वेड्याने पन्नास रूपये उचचले की त्याला डिसचार्ज दिला जाई व तसे न केल्यास त्याला पुन्हा एकदा चाचण्या पार करायला सांगितल्या जात. गरज पडल्यास पुन्हा उपचारासाठीही पाठविले जाई. हॉस्पीटलमधील एक वेडा शेवटच्या चाचणीपर्यंत सगळ्या चाचण्या पटापट पार करत असे मात्र शेवटच्या चाचणीला मात्र नापास होत असे. अनेकदा असे घडल्यावर चाचणी घेणारे डॉक्टर कंटाळले व त्यांनी एक युक्ती केली पुढच्या वेळेला त्या वेड्यासमोर एक पाच रूपयांची जुनी नोट व पन्नास रूपयांची कोरी करकरीत नवी नोट ठेवली तरीही त्या वेड्याने पाच रूपयांचीच नोट उचचली. हे पाहून डॉक्टर आश्चर्यचकित झाले व ओरडले,'' अरे मूर्खा, सगळ्या चाचण्या आरामात पार करतोस आणि शेवटच्या चाचणीत मात्र कायम चुकतोस. तुला पाच आणि पन्नास यातील फरक कळत नाही काय'' वेडा शांतपणे म्हणाला,'' ते मला चांगलं कळतं डॉक्टरसाहेब, पण इथून बाहेर पडलो की, मला रोजचा खर्च स्वत:लाच करावा लागणार आहे. त्यापेक्षा पाच रूपयांचे नाणे उचचले की, मला इथून बाहेर पडावे लागत नाही, पाच रूपयेही मिळतात आणि खाणेपिणेराहणे सगळे काही फुकटात होते. मग मी पन्नास रूपयांची नोट उचलून स्वत:च्या पायावर धोंडा पाडून का म्हणून घेऊ''
तात्पर्य :- काही नाही.
वर्तमानपत्रातून संग्रहित

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा